Rajan Salvi : आमदार राजन साळवींच्या पुतण्याची ठाण्याच्या एसीबी कार्यालयात चौकशी : ABP Majha
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांमागचा चौकशीचा ससेमिरा कायम आहे.राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांची आज ठाण्याच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशी होणार आहे. सर्व कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.आमदार राजन साळवी हे दुर्गेश साळवींसोबत ठाण्याच्या एसीबी कार्यालयात जाणार आहे. पहिल्यांदा अलिबाग, त्यानंतर रत्नागिरी आणि आता ठाणे एसीबी कार्यालयात साळवी कुटुंबाची चौकशी होतेय.