Nitesh Rane : संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर

Continues below advertisement

संतोष परब  हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली होती. त्यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमदार नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आज निर्णय दिला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram