Tuljapaur Farmers Loss : पंचनामे नीट न करणाऱ्यांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी
Continues below advertisement
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी पंचनामे नीट झाले नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 'पंचनामे नीट झाले नाहीत, कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा', अशी थेट मागणी कैलास पाटील यांनी केली आहे. अनेक ठिकाणी तलाठी (Talathi) तीन-तीन महिने गावात जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे, आपत्कालीन परिस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी हजर राहून शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित करणे अपेक्षित असताना, काही कर्मचारी कुचराई करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असा इशाराही शासनाकडून देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement