MLA Ganpat Gaikwad Case : द्वारली गावातल्या महिलांचा दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांना घेराव

Continues below advertisement

MLA Ganpat Gaikwad Case : द्वारली गावातल्या महिलांचा दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांना घेराव अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवर दोन दिवसापूर्वी स्थानिक महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत आरडाओरडा केला होता, याबाबतचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार गणपत गायकवाड हे या जागेवर येऊन ही जागा हडपण्याच्या प्रयत्न सुरू असताना या महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत,  जागा तू कब्जा करतोस तू कुठला आमदार आहेस,  आमदार हा गोरगरिबाचा असतो तू कोणाचा आमदार आहेस, असा सवाल केला. या संदर्भात महेश गायकवाड या महिलांना पाठिंबा देत होते. याच अनुषंगाने हा हल्ला झाल्याचा सध्या उल्हासनगर शहरात चर्चा सुरू आहे.  आणि हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram