MLA Fund Politics : '५ कोटी ही लाच आहे', Sanjay Raut यांचा महायुतीवर हल्लाबोल, जुने आमदार नाराज

Continues below advertisement
महायुती सरकारकडून (Mahayuti government) नवनिर्वाचित आमदारांना (First Time MLAs) निधी वाटप केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे, ज्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी, 'ही लाच आहे, पाच कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही' असे म्हणत या निधी वाटपावर थेट आक्षेप घेतला आहे. महायुतीमधील ५४ नवनिर्वाचित आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांप्रमाणे एकूण २७० कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये भाजपचे (BJP) ३३, शिंदे गटाचे (Shinde Faction) १४ आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) ८ आमदार असल्याचे समजते. सरकारच्या या निर्णयामुळे महायुतीतील अनेक ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांच्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निधीवाटप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात असल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola