MLA Disqualification : आमदार अपात्रताप्रकरणी सुप्रीम कोर्टात अजित पावरांना 3 आठवड्यांचा वेळ

Continues below advertisement

MLA Disqualification : आमदार अपात्रताप्रकरणी सुप्रीम कोर्टात अजित पावरांना 3 आठवड्यांचा वेळ ाष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवारांनी मागितला वेळ  सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती  सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख कोर्टासमोर करण्यात आला   अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला   त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे  गेल्या सुनावणीत अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी त्यांच म्हणणं सादर कराव असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते 

हेही वाचा : राज्यात मराठा आरक्षणावरुन विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत जबाब दो आंदोलन सुरू करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केले जाणार होते. रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले त्यावेळी त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.   मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी “जवाब दो जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो” या नाऱ्याखाली आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होणार होते त्यानुसार मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी केरे पाटलांसाह अन्य आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.  मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांची गाडी गिरगाव चौराटी येथे अडवली. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होते, मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते. याआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोनल केलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram