MLA disqualification : विधानसभा अध्यक्ष येत्या सोमवारी सुनावणी घेणार, कायदेतज्ज्ञानांशी चर्चा करणार
abp majha web team
Updated at:
22 Sep 2023 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी घेणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या केसमध्ये केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करायचं आहे याची आठवण सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत करून दिली होती. त्यामुळे येत्या सोमवारच्या सुनावणीत नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.