Bachchu Kadu Nagpur : कर्जमाफीची तारीख मिळाली, बच्चू कडूंचं अमरावतीत जंगी स्वागत
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीची (Farmer Loan Waiver) तारीख मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांचं अमरावतीत (Amravati) जंगी स्वागत करण्यात आलं. 'बच्चू कडू जिवंत आहे ना? बच्चू कडू मरा थोडा आहे तो जिंदा आहे आणि ओ जिंदा आहे, तो किसान भी जिंदा रहेगा और जो भी बोला है, वो वसूल कर के लेंगे,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला. नागपूरमधील आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तिवस्यामध्ये बैलगाडीतून बच्चू कडूंची मिरवणूक काढण्यात आली. आत्ता कर्जमाफी करण्याऐवजी भविष्यात कर्जमाफी मिळणं कसं फायद्याचं आहे, हे बच्चू कडू शेतकऱ्यांना पटवून देताना दिसले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement