उद्यापासून राज्यात दुकाने सुरु ठेवण्यासाठी दोन तास वाढवले, राज्य सरकारचा निर्णय
Continues below advertisement
राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, असे आदेश मुख्य सचिवांनी काल काढले आहेत. उद्या, गुरुवार 9 जुलैपासून ही संमती देण्यात आली आहे. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा 5 अंतर्गत काल (मंगळवारी) यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत.
Continues below advertisement