Mira Manjhi यांच्या कुटुंबाला PM Narendra Modi यांची खास 'भेट', काय म्हणालं कुटुंब?
Mira Manjhi यांच्या कुटुंबाला PM Narendra Modi यांची खास 'भेट', काय म्हणालं कुटुंब?
अयोध्या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या १० कोटीव्या लाभार्थी महिलेल्या घरी भेट दिली... त्यावेळी देशाच्या पंतप्रधानाने आपल्या घराला पाय लावल्याने मीरा माझी या कृतार्थ झाल्या होत्या... त्यावेळी नरेंद्र मोदी यांना त्यांनी चहाही दिला. मोदींनी तो चहा आनंदाने घेतला. मोदी निघून गेले. मात्र, महिलेच्या मनातल्या अनंद लहरी थांबायचं नाव घेत नव्हत्या... त्या इतक्या भावुक झाल्या की, ज्या कपातून मोदींनी चहा घेतला तो कप त्यांनी देव्हाऱ्यात ठेवला. आणि त्या कपाची त्या रोज पूजाही करतायत. ही गोष्ट नरेंद्र मोदी यांना समजल्यावर मोदींनी मीरा मांझी यांना भेटवस्तूंचा एक सेटही पाठवला. ज्यात चहाच्या कपांचा सेट, विविध रंगांसह, रेखाचित्रांचं पुस्तक आणि बऱ्याच भेटवस्तूंचा समावेश आहे. एकूणच, मोदींच्या भेटीमुळे अयोध्येतील सामान्य कुटुंबातील मीरा मांझी हे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. एका अर्थानं, मोदींची भेट, चहाचा कप, देव्हारा आणि पुन्हा भेटवस्तू असे वळसे घेत मीरा मांझी यांची ही गोष्ट सुफळ संपूर्ण झालीय.