अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आजही शक्य, फडणवीसांनाही मान्य, ठाकरेंनी विचार करावा : रामदास आठवले
मुंबई : राज्यात विरोधी पक्षाकडून सतत सत्ताबदलाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. यात आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात बोलताना ते म्हणाले की, अजूनही काही बिघडलेले नाही. अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं. आमची इच्छा आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचार करावा, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. हे फडणवीसांना मान्य आहे, असंही ते म्हणाले.