OBC Protest Row : 'बैठकीला न येणे योग्य नाही', आंदोलकांवर Chandrashekhar Bawankule यांची टीका
Continues below advertisement
राज्यातील संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीकडे पाठ फिरवल्याने बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. 'इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही,' असे स्पष्ट मत बावनकुळे यांनी मांडले. सरकारने चर्चेची तयारी दाखवली असून, स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार होते, असेही त्यांनी नमूद केले. आंदोलकांनी आधी बैठकीला येण्याचे मान्य केले होते, मात्र आता ते टाळत असल्याने सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद चर्चेतूनच सोडवला पाहिजे, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement