Minister Bhagwat Karad : ...जेव्हा केंद्रीय मंत्री डॉक्टरी पेशाला जागतात
Continues below advertisement
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या डाॅक्टरी पेक्षाची झलक ते मंत्री झाल्यानंतरही अनेकदा पहायला मिळाली. औरंगाबादेत रस्त्यावर रिक्षा उलटली तेव्हा त्यांनी मंत्रीपदाचा कुठलाही बडेजाव न दाखवता गाडीतून उतरून जखमी मुलावर जागेवर प्राथमिक उपचार करून नंतर त्याला आपल्याच गाडीतून रुग्णालयात भरती केले होते. आता तर विमान प्रवासात देखील त्यांनी अचानक रक्तदाब वाढलेल्या प्रवाशाला बरे केल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement