Milk Rate issue | दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्ष रस्त्यावर, उद्या मंत्रालयात बैठक

Continues below advertisement
 राज्यभरात दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आज रस्त्यावर उतरले आहेत. आज दुधाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. अकोले, अहमदनगर येथे दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला. तर दुध संकलन वाढवावे यासाठी भाजपकडून शासनाला निवेदन देण्यात आले.

दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला भाव द्यावा, यासह विवीध मागण्यांसाठी शिवसंग्राम, भाजप आणि महायुतीचे घटकपक्ष यांच्या माध्यमातून राज्यभर आज केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. जिल्हा तालुका स्तरावर प्रतिकात्मक आंदोलन करून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन आणि दूध पिशवीची भेट दिली जाणार आहे, जर या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाहीतर 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेन मंगळवारी दूध बंद आंदोलन पुकारले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram