Milk Price Protest : 34 रुपये दराचा आदेश काढूनही दूधसंघ दर देईना, शेतकऱ्यांचं आंदोलन

Continues below advertisement

Milk Price Protest : 34 रुपये दराचा आदेश काढूनही दूधसंघ दर देईना, शेतकऱ्यांचं आंदोलन

राज्य सरकारच्या दुध दर समीतीने दुधाला 34 रूपये दर देण्याचा आदेश काढूनही दुधसंघ दर देत नसल्याने आज राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जातेय.. आज अहमदनगर जिल्ह्यासह 21 ठिकाणी आदेशाची होळी करण्यात आलीय... किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात अकोले तालुक्यात आज आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारने दुधाला किमान 34 रूपये दर निश्चित केला आणी तसा आदेशही काढला आहे मात्र दुधसंघांनी आदेशाला केराची टोपली दाखवली असून दुधाला कवडीमोल भाव देताहेत त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.. आज सरकारच्या या आदेशाची किसान सभा आणी दुध उत्पादकांनी होळी करत सरकारचा निषेध केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram