Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान, मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?

Continues below advertisement

Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान,  मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena Uddhav Thackeray) निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी (Rajan Salvi) आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला. मात्र, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही पक्षाच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याकडून दखल घेतली जात नसल्यामुळे राजन साळवी (Rajan Salvi) हा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षात राजन साळवी यांच्या मागे सातत्याने तपास यंत्रणांचा ससेमिरा असल्याचेही पाहायला मिळत होते. त्यामुळे राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राजन साळवी चांगले कार्यकर्ते - प्रवीण दरेकर 

प्रवीण दरेकर म्हणाले, राजन साळवी हे शिवसेनेचे एक चांगले कार्यकर्ते आहेत.  उरलेले उभाठाचे नेते हे अस्वस्थ आहेत, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी राजन साळवींचं कौतुक केलंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram