Accident | सोलापूरहून झारखंडला जाणाऱ्या मजुरांच्या एसटी बसला अपघात; 3 मजुरांचा मृत्यू तर 22 जखमी

लॉकडाऊनमुळं पोटाची खळगी भरू न शकल्यानं मजुरांचं स्थलांतर सुरुच आहे. अशावेळी त्यांच्या अपघातांची मालिकाही सुरुच आहे. यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसनं टिप्परला धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय. या अपघातात बसमधील ३ मजुरांचा मृत्यू झालाय तर २२ जण जखमी आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. यवतमाळच्या आर्णीनजिकच्या कोळवन गावात हा अपघात झालाय. ही बस मजुरांना घेऊन सोलापूरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola