MHT CET कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली-शिक्षणमंत्री उदय सामंत

Continues below advertisement
मुंबई : महाराष्ट्र सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ( सीईटी परीक्षा) तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा आधी जुलै महिन्यात घ्यायचे योजले होते. त्यानुसार या परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram