Mhada Exam : म्हाडाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच, सचिव श्री राजकुमार सागर यांची माहिती
abp majha web team
Updated at:
07 Feb 2022 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी होणारी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. अशी माहिती 'म्हाडा'चे सचिव श्री राजकुमार सागर यांनी दिली. म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार आज सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे.