MHADA Exam Racket चं औरंगाबाद कनेक्शन, परीक्षेचं कंत्राट मिळालेली कंपनीवर संशय
MHADA Exam Latest Update : म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर भाजपने आव्हाड आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.