Mhada Exam च्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Mhada Exam Time Table 2021 - 2022 : पेपरफुटी प्रकरणामुळे गतवर्षी होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती. परंतु, एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी होणार आहे. त्यामुळे म्हाडा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हाडा परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या परीक्षा होणार आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (MHADA Exam Time Table)
म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.