Maharashtra Live Superfast News : 05.00 PM : सुपरफास्ट बातम्या : 17 SEP 2025 : ABP Majha
मुंबईतील दादर शिवाजी पार्कमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताकडून लाल रंग फेकण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात कलम २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं स्थापन करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र, पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नसल्याने पोलिसांना अडचणी येत आहेत. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी केली आणि "बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला, म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न केला गेला. असेच कोणाचं तरी महाराष्ट्र पेटविण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल," असे म्हटले. राज ठाकरे यांनी पोलिसांना सर्व सीसीटीव्ही तपासत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. खासदार अनिल देसाई यांनी या घटनेला सरकारचे अपयश म्हटले. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाजकंटकांना कडक शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया दिली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त केला. अंबादास दानवे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने कारवाईची मागणी केली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनीही या कृत्याचा निषेध केला. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने रंग फेकणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले.