Medical Recruitment : 287 लॅब असिस्टंट पद उमेदवारांना निकाल लागून 6 महिने तरीही नियुक्ती पत्रच नाही

Medical Recruitment : 287 लॅब असिस्टंट पदाच्या उमेदवारांना नियुक्ती पत्रच नाही 
बातमी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराची. तब्बल २८७ लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठी उमेदवार सहा महिन्यांपूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेलं नाहीये. यातील अनेक पात्र उमेदवार मंगळवारी मुंबईत आले होते, आणि त्यांनी DMERच्या आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त राजू निवतकर यांनी भेट दिली नाही. DMERच्या कार्यालयातून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतायेत. शासकीय नोकरी मिळणार म्हणून अनेक उमेदवारांनी कंत्राटी नोकरी देखील सोडली. मात्र शासकीय अनास्थेमुळे सहा महिने उलटूनही त्यांना नियुक्ती पत्र मिळत नाहीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola