वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Continues below advertisement
राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही अनिश्चितता दूर करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांना दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement