Meal With Mom : केंद्रसरकारचं नागरिकांना आवाहन, आईसह जेवणाचा फोटो शेअर करा : ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईच्या भेटीसाठी गुजरातला जातात तेव्हा आईसोबत आवर्जून भोजन करतात.. त्यांच्या आईसोबतच्या जेवणाच्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगते. आज आशाच पद्धतीनं आपल्या आईसोबत होळी साजरी करण्याचं आवाहन भारत सरकारनं देशातील नागरिकांना केलंय.. होळी निमित्तानं आईसह जेवणाचा आस्वाद घ्या आणि हा फोटो शेअर करा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलंय. यासाठी मील विथ मॉम हा हॅशटॅगही तयार करण्यात आलाय. यातील काही निवडक फोटो आता सरकार त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध करणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola