MCA Powerplay: अध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांत रस्सीखेच, Prasad Lad आणि Sarnaik यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट!

Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad), शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि किरण सामंत (Kiran Samant) यांसारखे नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटी घेतल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 'शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संमतीनंतरच एका उमेदवाराचं नाव निश्चित होईल'. येत्या १२ नोव्हेंबरला एमसीएच्या कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग यांनीही पवारांशी चर्चा केली. शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत हे देखील एमसीएच्या प्रशासनात येण्यास उत्सुक असून, त्यांचे बंधू उदय सामंत यांनीही पवारांची भेट घेतल्याचे समजते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola