Jitendra Awhad MCA Vice President : जितेंद्र आव्हाड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी

Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, अध्यक्षपदी अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नवीन शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव करत उपाध्यक्षपद पटकावले आहे. या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या पॅनलने मोठे यश मिळवले असून, सचिवपदी उन्मेष खानविलकर, संयुक्त सचिवपदी निलेश भोसले आणि खजिनदारपदी अरमान मलिक यांची निवड झाली आहे. शिवसेना (UBT) नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचीही अपेक्स कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून निवड झाली आहे. एका वृत्तानुसार, 'शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जी यादी निश्चित झाली होती, त्याच यादीचा या निवडणुकीवर प्रभाव दिसून आला.'
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola