MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, अध्यक्षपदी अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नवीन शेट्टी यांचा पराभव केला. 'माननीय मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट, माननीय शरद पवार यांचा सपोर्ट आणि आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही सगळे लढवली,' अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. सचिवपदी उन्मेष खानविलकर, सहसचिवपदी नीलेश भोसले आणि खजिनदारपदी अरमान मलिक यांनी विजय मिळवला आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) पुन्हा एकदा कार्यकारिणी समितीवर निवडून आले आहेत. एकूण ३६२ जणांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. राजदीप गुप्ता (Rajdeep Gupta) यांची टी-२० मुंबई लीगच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement