Matheran E Rikshaw : माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करायला परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Matheran E Rikshaw : माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करायला परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय .पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० रिक्षा सुरू कराव्यात आणि या रिक्षा हातरिक्षा चालकांनाच द्याव्यात, असे आदेशही न्या. भूषण गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिले आहेत.