Matheran E Auto Rickshaw : माथेरानमध्ये लवकरच ई रिक्षा धावणार, हातरिक्षा इतिहासजमा होणार ABP Majha
Continues below advertisement
राज्यातल्या माथेरान या पर्यटन स्थळी ई-रिक्षा सुरु करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. पुढील तीन महिन्यात ई-रिक्षाची ट्रायल घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. निसर्गरम्य माथेरानमध्ये जगभरातून पर्यटक येतात. मात्र पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी पायपीट, हात रिक्षा आणि घोडेस्वारी शिवाय पर्याय नाही. या अमानवी वाहतुकीविरोधात पर्यावरण मित्र सुनील शिंदे यांनी न्यायालयीन लढा दिला. त्यांच्या या लढ्याला अखेर यश आलं असून सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षाला हिरवा कंदील दिलाय. या ऐतिहासिक निर्णयाचे माथेरानकरांनी स्वागत केलंय. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
Continues below advertisement