मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, कलाकार,पत्रकारांसह अनेक डॉक्टरांचा पुरस्काराने सन्मान

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे वर्ष 2020 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या 79व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख 11 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola