Eye Flu : डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ, 11 दिवसांत 1 लाख जणांना संसर्ग
आता बातमी आहे डोळ्यांच्या साथीसंदर्भातली... राज्यात गेल्या ११ दिवसांत १ लाख रुग्ण आढळून आलेत. राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यानुसार महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसंच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेतत. राज्यात आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात डोळे येण्याचं सर्वाधिक ४५ हजार ८६५ रुग्ण सापडले आहेत.