ABP News

Massajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संताप

Continues below advertisement

Massajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संताप

 आकांचा आका असा उल्लेख करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . दरम्यान ,चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनीच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचे भेट घडवून दिली असा आरोप मस्साजोगमधील नागरिकांनी केलाय .(Suresh Das meet Dhananjay Munde)चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्र्यांचीही एकदा भेट घालून द्यावी म्हणजे मग आम्ही या केसमधून विड्रॉल होतो , असे म्हणत सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मस्साजोगचे नागरिक आक्रमक झाल्याचे दिसले .

सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठबळ दिले आहे .संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या ज्या कारवाया झाल्या , ज्या चौकशीबाबत सुरेश धस यांनी मागणी केली त्या सर्व फडणवीस यांनी पूर्ण केल्या असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो असं वक्तव्य केल्यानंतर मस्साजोगमधील नागरिक आक्रमक झाले होते . समाजाचे नेतृत्व म्हणून आम्हाला मनोज जरांगे पाटील हवे आहेत .हे प्रकरण लावून धरण्यासाठी आम्हाला सुरेश धसही हवे आहेत अशी भूमिका मसाजोगच्या नागरिकांनी घेतली .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram