Mask Free Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध हटवले ,सण यात्रा -जत्रा आता धुमधडक्यात

Continues below advertisement

गुढीपाडव्याला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या नव्या वर्षात महाराष्ट्र आता नव्या उमेदीनं सुरुवात करणार आहे.. कारण तब्बल ७३६ दिवसांच्या कोरोना निर्बंधांच्या बेड्या राज्य सरकारनं तोडण्याचा निर्णय घेतलाय.... त्यामुळे नव्या वर्षात मराठीजन निर्बंधांविना मोकळा श्वास घेणार आहेत..  यात सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो मास्कमुक्तीचा. मास्क घालणं ऐच्छिक करण्यात आलंय. त्यामुळे एका अर्थी ही मास्कमुक्ती आहे असं म्हटल्यासही वावगं ठरणार नाही. त्यासोबत ५० टक्के उपस्थितीची अट, दुहेरी लसीकरण ही अटीही मागे घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई लोकमधून प्रवास करण्यासाठी लसीकरणाचं  प्रमाणपत्र आवश्यक नसेल. निर्बंध उठल्यानं आता मंदिरांमधील दर्शनासाठी असलेले निर्बंध उठणार आहेत, त्यामुळे देवाच्या चरणी माथा टेकवत दर्शन घेणं शक्य होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर गुढीपाडव्य़ासह इतर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram