Marine Drive Rain Update : समूद्र खवळला! मरिन ड्राइव्हवर उंचच उंच लाटा, पावासाचा वेग वाढण्याची शक्यता
मुंबईत बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पडत आहे. गेल्या ६-७ तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, गोरेगाव, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, कुर्ला आणि घाटकोपर भागात काही प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे असाच सुरु राहिल्यास रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता आहे.
भारतीय विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३-४ तासांत मुंबईच्या काही भागात ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच येत्या काही तासांत दादर, वरळी, वांद्रे, महालक्ष्मी, कुर्ला, बीकेसी, चेंबूर, घाटकोपर येथे सर्वात जास्त पाऊस पडणार असून ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.