Marine Drive Crime : शासकीय वस्तीगृहात मुलीची हत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ DGP यांची भेट
मुंबईतील एका शासकीय वसतिगृहात 18 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली. यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येतायेत. याचबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील, याबाबत एक निवेदन हे शिष्टमंडळ पोलीस महासंचलाकांना देणार आहे.