Doctors Strike: 'न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार', MARD चा इशारा, रुग्णसेवा ठप्प
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) या संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. 'त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे,' असा स्पष्ट इशारा मार्डने दिला आहे. या आंदोलनाअंतर्गत निवासी डॉक्टरांनी ओपीडी (OPD) आणि इतर नॉन-इमर्जन्सी सेवा बंद ठेवल्या आहेत, मात्र आपत्कालीन सेवा (Emergency Services) सुरू आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी, प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) आणि पीडितेच्या कुटुंबाला ५ कोटी रुपयांची भरपाई अशा अनेक मागण्या संघटनांनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास १४ नोव्हेंबरपासून आपत्कालीन सेवाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement