Mard Doctors Strike : आजपासून मार्डच्या निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप, डॉ. कुरा यांच्याविरोधात निवेदन
Continues below advertisement
Mard Doctors Strike : आजपासून मार्डच्या निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप, डॉ. कुरा यांच्याविरोधात निवेदन
जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी आजपासून ‘मार्ड’चे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. संपामुळे बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डॉ. कुरा हे मानसिक त्रास देत वारंवार परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकी देत असल्याचा आरोप या निवासी डॉक्टरांनी अधिष्ठात्यांकडे केला होता. तसं निवेदनही डॉक्टरांनी दिलं होतं. त्यानंतर कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र डॉ.कुरा यांना हटवण्याच्या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत.
Continues below advertisement