Maharashtra Rains :पुढील दोन दिवस मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट, पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांना फटका
पुढील दोन दिवस मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलीय. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालंय. तूर, गहू, हरभऱ्यासह संत्री पिकांचंही मोठं नुकसान झालंय. त्यातच पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आल्यानं शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.