Beed Flood : मुख्यमंत्रीसाहेब, हे वास्तव पाहा... हे नदीचं पात्र नव्हे तर बळीराजाची शेती... ABP Majha
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
30 Sep 2021 07:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Marathwada Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.