Marathwada Floods | ड्रोनमधून महाप्रलयाची भयावह दृश्ये, Godavari, Manjra रौद्र रूपात
मराठवाड्यात आलेल्या महाप्रलयाची भयावह दृश्ये ड्रोनच्या माध्यमातून समोर आली आहेत. सोलापूरमधील सीना नदीला आलेल्या महापुराने मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी नदी परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थितीत आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याच्या परिसरातून गोदावरीचे रौद्र रूप दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यातील उजनी गावात तेरणा नदीला पूर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तेरणा प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. घरे, शाळा, दुकाने आणि बँकांमध्ये पाणी शिरले आहे. शेतातील पिके कुजून गेली आहेत. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मांजरा नदीनेही रौद्र रूप धारण केले असून, शेतांना नदीचे स्वरूप आले आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.