Marathwada Drought : हवामान बदलाचा परिणाम, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचं सावट ABP Majha
जागतिक हवामान बदलामुळे मराठवाड्यावर आता पुन्हा दुष्काळाचं संकट ओढावलं. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय. त्यात मराठवाड्याची राजधानी ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला दुष्काळासह पुराचाही धोका सांगण्यात आला. तर, हिंगोली अत्यंत असुरक्षित असल्याचं म्हटलंय. दिल्लीच्या काऊन्सिल ऑन एनर्जी, एनव्हायर्मेंट अँड वॉटर या संस्थेनं पहिल्यांदाच २७ राज्यांमधील ६४० जिल्ह्यांच्या हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास केला आणि अहवाल जाहीर केला. त्यात मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय.