Marathi Sign Boards Compulsory : दोन महिन्यांत मराठी पाट्या लावा; दिल्लीतून आले 'सर्वोच्च' आदेश

Continues below advertisement

दसरा-दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दुकानदारांना दिलेत. गेल्या वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते. राज्य सरकार भाषेच्या बाबतीत दुकानदारांवर मोठ्या आर्थिक भुर्दंडाची सक्ती लादू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादारांनी केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाचा आदेश उचित ठरवताना व्यापारी संघटनेने केलेली याचिका २५ हजार रुपये दंड ठोठावून फेटाळली होती. या निकालाविरुद्ध व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram