Marathi Sign Board : दुकानांवरील मराठी पाट्यांविरोधातील याचिका हायकोर्टानं दंड आकारत फेटाळली
Continues below advertisement
दुकानांवर मराठी पाट्या लावण्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. कोर्टानं याचिकाकर्त्यांना 25 हजारांचा दंड आकारत ती रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातल्या दुकानांवर मराठी भाषेतील नाव सर्वात मोठ्या अक्षरात असावं असे आदेश राज्य सरकारनं दिले होते. या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेटर्स संघटनेनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र दुकानदारांपेक्षा ग्राहक महत्वाचे आणि त्यामुळे दुकानांवरील पाट्यांवर स्थानिक भाषा असणं योग्य आहे असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Marathi ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi