Marathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?
Marathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?
हेही वाचा :
चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या के. एन. गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर १६ येथील छेदिराम अलगुराम गुप्ता (70 वर्ष) यांच्या राहत्या घराला आग (Chembur Fire) लागली. गुप्ता यांचे राहते घर 1+2 पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉक सर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली.
चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी आहे. या कॉलनीत दाटीवाटीनं घरं आहे. मोठ्या प्रमाणात लोक इथं राहतात. सतत गजबज असलेला हा भाग आहे. शनिवारी रात्री इथं सर्व जण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. पहाटे साडेचार वाजता घरात आग लागली. झोपेत असल्याने अनेकांना काय घडलं हे समजलंच नाही. ज्यावेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता, हे आता समोर येत आहे.