Marathi Language Bill : स्थानिक प्राधिकरण राजभाषा सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर ABP Majha
महाराष्ट्रात राहूनही प्रशासकीय कामात मराठीपासून पळवाटा शोधू पाहणाऱ्यांना चाप लावणारी बातमी... मराठी भाषेकडे दुर्लक्ष कराल तर आता कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. कारण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, महापालिका आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय कार्यालयातील व्यवहार मराठीतून करण्याबाबत राज्य सरकारनं सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर केलंय.. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, म्हाडा यासारख्या प्राधिकरणांनाही आता आपला कारभार मराठीतच करावा लागेल.