Marathi Bhasha Abhijat Darja : अभिमानास्पद! केंद्राचा मोठा निर्णय, मराठी भाषेला अभिजात दर्जा

Continues below advertisement

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिनु

मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा

महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्राची मागणी अखेर मान्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अधिकृत घोषणा

Classical Language Status: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं. 
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. 

List of India Classical Language: देशातल्या अभिजात भाषांचा  प्रवास 

सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. 
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. पहिली भाषा 2004 मध्ये तामिळ आणि त्यानंतर 2014 मध्ये उडिया भाषेला मिळाला आहे. 
मराठीला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ही संख्या सात इतकी होईल. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram