Marathawada Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर, पावसामुळे 12 जणांचा मृत्यू! ABP Majha

Continues below advertisement

Marathawada Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर, पावसामुळे 12 जणांचा मृत्यू! ABP Majha

वाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे सुख निसर्गाला का बघवले जात नसेल हे कळावयास मार्ग नाही. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसतो व त्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास निसर्ग हिरावून नेतो. कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट अशा संकटांशी या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांना कायमच दोन हात करावे लागतात. आताही तेच झाले आहे. सरल्या आठवडय़ाच्या अखेरीस मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पाऊस इतका भयंकर होता की, अवघ्या काही तासांत सर्व नदीनाल्यांना पूर आला. अनेक गावांना पुराचा वेढा पडला. शेतांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाले व शेतातील सारी पिके शेतकऱ्यांच्या डोळय़ांदेखत जमीनदोस्त झाली. काढणीला आलेल्या किंवा सोंगून ठेवलेल्या मूग, उडीद या पिकांच्या राशी एकतर वाहून गेल्या किंवा पावसात भिजून ही पिके नष्ट झाली. कापूस, सोयाबीन, हळद, मका ही शेतातील तरारून आलेली पिके यंदा चांगले उत्पन्न देणार, असे वाटत असतानाच खरिपाची ही सर्व पिके अतिवृष्टीत नष्ट होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली. मराठवाड्यातील दीड हजारहून अधिक गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले. दोन-तीन दिवसांतील पाऊस व पुरामुळे मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत एकंदर 12 जणांचा मृत्यू झाला. दीडशेहून अधिक जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या अतिवृष्टीने मराठवाड्यातील सुमारे 8 ते 10 लाख हेक्टरवरील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram