Zero Hour : 'दिल्लीचा लाल्या सांगतो, मराठ्यांना टार्गेट करा', जरांगे पाटलांचा Rahul Gandhi वर आरोप
Continues below advertisement
मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) नेत्यांमधील आरक्षणावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला असून, मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'दिल्लीचा लाल्या (Rahul Gandhi) महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना सांगतो की मराठ्यांना लक्ष्य करा, त्यानुसार विजय वडेट्टीवार व त्यांच्यासारखे नेते महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत,' असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांच्या मते, ओबीसींच्या नावाखाली मोर्चे काढून वडेट्टीवार राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना, वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांचा 'लहान वयातील बाल्या' असा उल्लेख करत त्यांची बुद्धी बालिश असल्याचे म्हटले आहे. हा वाद चिघळत असताना, राज्यात ओबीसी समाजाने २ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मोठा मोर्चा काढला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement