Reservation Row: 'तुम्ही काय आंबे पेरलेत का?'; लक्ष्मण हक्केंचा विजयसिंग पंडितांना थेट सवाल
Continues below advertisement
बीडमधील (Beed) ओबीसी महाएल्गार सभेत (OBC Mahaelgar Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित (Vijaysing Pandit) आणि ओबीसी नेते लक्ष्मण हके (Laxman Hake) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. 'आम्ही विष पेरतो, तर तुम्ही काय आंबे पेरलेत का?', असा खोचक सवाल लक्ष्मण हके यांनी विजयसिंग पंडितांना विचारला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीजण चार्जिंगवर चालणाऱ्या बाहुल्यांप्रमाणे समाजात विष पेरत असल्याचा आरोप पंडित यांनी केला होता. यावर उत्तर देताना, 'आम्ही चार्जिंगवर चालतो तर जरांगे कोणाच्या चावीवर चालतात? शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांची (Ajit Pawar) चावी आम्हाला खोलायला लावू नका,' असा इशारा हके यांनी दिला. बीडमध्ये आग तुम्ही लावली आणि ती विझवण्याचं काम ओबीसी बांधव करत आहेत, असेही हके म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement